Jio, Airtel, Vodafone-Idea अन् BSNL चे 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स तुम्हाला माहितीयेत का ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल, वोडफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल या कंपन्या ग्राहकांना अनेक ऑफर्स देत असतात. सर्वच कंपन्या कमी किंमतीत जास्त फायदा देत युजरला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. या कंपन्यांचे असे काही प्लॅन्स आहेत जे 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत. ते कोणते आहेत आणि त्याचे काय फायदे मिळतात याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

रिलायन्स जिओचे प्लॅन –
1) जिओच्या 11 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 1 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता युजरच्या करंट प्लॅनएवढी असणार आहे.

2) 21 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता युजरच्या करंट प्लॅनएवढी आहे.

एअरटेलचे प्लॅन –
1) 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 200 एमबी डेटा दिला जातो. याची वैधता 2 दिवस आहे. यासोबत कोणत्याही नेटवर्कवर अनिलिमिटेड कॉलिंग दिलं जातं.

2) 45 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 28 दिवसांची वैधता मिळते.

3) 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 3 जीबी डेटा सोबत 28 दिवसांची वैधता मिळते.

4) 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 38.52 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. सोबत 100 एमबी डेटा आणि 28 दिवस वैधता मिळते.

वोडाफोन-आयडियाचे प्लॅन
1) 16 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 1 जीबी डेटा 24 तासांसाठी दिला जातो.

2) 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 2 दिवसांची वैधता दिली जाते. सोबत 200 एमबी डेटा दिला जातो. सोबत ट्रुली अनलिमिटेड कॉल्स कोणत्याही नेटवर्कवर दिले जातात.

3) 39 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 30 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. सोबत 100 एमबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे.

4) 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 28 दिवसांच्या वैधते सोबत 3 जीबी डेटा दिला जातो.

5) 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजरला 38 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. सोबत 100 एमबी डेटा दिला जातो. 200 एमबी अतिरीक्त डेटाही मिळतो. एकूण मिळून या प्लॅनमध्ये 300 एमबी डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवस आहे.

बीएसएनएलचे प्लॅन –
1) नुकताच कंपनीनं एआरसी 47 लाँच केला आहे. या प्लॅन अंतर्गत अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग मिळतं. यात युजरला रोमिंग, एसटीडी आणि लोकल कॉल मिळतात. सोबत 14 जीबी डेटाही मिळतो. रोज 100 एसएमएस देखील यात मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. चेन्नई आणि तमिळनाडूमध्ये हा प्लॅन उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच हा प्लॅन दुसऱ्या सर्कलमध्येही उपलब्ध केला जाणार आहे.

2) 49 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजरला 2 जीबी डेटा दिला जातो. सोबत कॉलिंगसाठी 100 मिनिटेही दिली जातात. याची वैधता 28 दिवस आहे.