स्विमिंगपासून ब्रिथिंगपर्यंत फुफ्फुसांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी करा ‘या’ 4 लंग्ज एक्सरसाईज, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग फुफ्फुसांवर हल्ला करतो. या कारणामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच रिकव्हर झालेल्या रूग्णांची फुफ्फुसे खुप कमजोर होतात. याशिवाय प्रदूषण किंवा धूम्रपान सारख्या चुकीच्या सवयींनी सुद्धा फुफ्फुसे कमजोर होतात. परंतु, तुम्ही रोज काही एक्सरसाईज करून आपली फुफ्फुसे मजबूत ठेवू शकता. या एक्सरसाईज कोणत्या ते जाणून घेवूयात…

1 स्विमिंग

स्विमिंग करताना फुफ्फुसे खुप सक्रिय राहतात, यामुळे त्यांची क्षमता वाढते. मसल्स मजबूत होतात.

2 ब्रिथिंग

ब्रिथिंग एक्सरसाइज दरम्यान दिर्घ श्वास घेणे-सोडण्याने फुफ्फुसे पुर्णपणे उघडू लागतात, मजबूत होतात.

3 योग

योग करताना दिर्घ श्वास घेतल्याने शरीरात रक्तसंचार चांगला होतो, ज्यामुळे फुफ्फुसांना योग्य पोषण आणि ऑक्सीजन मिळतो. यामुळे फुफ्फुसे निरोगी होतात.

4 कार्डियो

रनिंग किंवा अन्य कार्डियो एक्सरसाईजचा सराव करण्यासाठी जास्त ऑक्सीजनची आवश्यकता असते. ज्यासाठी फुफ्फुसे जास्त मेहनत करतात. या मेहनतीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि ती मजबूत होतात.