मराठा आंदोलनाचं केंद्र परळीच, यापुढील सर्व चर्चा येथूनच होतील – आबासाहेब पाटील

परळी (बीड) : पोलीसनामा आॅनलाईन-

मराठा आंदोलनाचे केंद्र परळी असून, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांची चर्चा फक्त परळी येथूनच होईल. त्यामुळे सरकारने इतर लोकांशी बोलू नये, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी  बोलताना सांगितले आहे.
[amazon_link asins=’B079CGSQ8W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c2029c4-8f4d-11e8-b385-e11b64ecfa3c’]

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. परळी हे आंदोलनाचे केंद्र असून, सरकारने परळी येथील समाज बांधवाशी चर्चेने यावर तोडगा काढावा असे आवाहन आबासाहेब पाटील यांनी केले आहे.
तसेच, सरकारने जर इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल, तर आम्हाला ते मान्य होणार नाही. जी काही चर्चा करायची आहे, येथूनच होईल अशी स्पष्ट भूमिका परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी मांडली आहे.
पहा नेमक्या काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्याः
1. राज्य सरकार करत असलेल्या मेगा भरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.
2. अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.
3. कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.