आजपासून ‘या’ भागातील पीएमपीची सेवा बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पीएमपीतर्फे शहरासह उपनगरांतही सेवा पुरवली जाते. यानूसार नगर रस्त्यावरुन वाघोली, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ या लांब पल्ल्यांच्या मार्गावर सेवा दिली जाते. पीएमपीने नगर रस्त्यावरील लांब पल्ल्याची थेट वाहतूक बंद केली आहे. जादा बसेस उपलब्ध व्हाव्या आणि फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांना सुरळीत सेवेसाठी या मार्गावर दोन टप्प्यांत वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
सातत्याने जाम होणारा रस्ता, कोंडी यामुळे अनेकदा पीएमपीच्या लांब पल्ल्यांच्या मार्गावरील फेऱ्यांना उशीर होतो, तर काही वेळा नाईलाजास्तव फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवते.
पीएमपीतर्फे शहरासह उपनगरांतही सेवा पुरवली जाते. यानूसार नगर रस्त्यावरुन वाघोली, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ या लांब पल्ल्यांच्या मार्गावर सेवा दिली जाते. महापालिका ते पाबळ अंतर सुमारे ४१ किलोमीटर इतके मोठे आहे. यातच नगर रस्ता सातत्याने वाहतूक कोंडीत अडकत असल्याने ये-जा करणाऱ्या पीएमपी बसेसला उशीर होत असे, तर अनेकदा तासनतास बस कोंडीत अडकून पडल्याने फेऱ्याही रद्द करण्याची नामुष्की येते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक दोन टप्प्यात सुरू करण्यात आली असून आजपासून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
यापूर्वीही पीएमपीकडून असा निर्णय घेण्यात आला आहे. लांब पल्ल्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी साधारण तीन महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन ते राजगुरुनगर थेट सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून पुणे स्टेशनवरुन भोसरीपर्यंत सेवा पुरवली जाते. तर, भोसरीवरुन राजगुरुनगरसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
या कारणांमुळे केली थेट बससेवा बंद –
-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांची संख्या कमी.
-लांब पल्ल्यांचा मार्ग असल्याने बसेसला उशीर.
-महापालिका ते वाघोली आणि वाघोली ते पाबळ, तळेगाव या दोन टप्प्यात फेऱ्या वाढण्याची शक्‍यता
-प्रवाशांना जादा बसेस उपलब्ध होणार

विक्रीसाठी आणलेले ७ पिस्तूल, २८ जिवंत कुडतुसे जप्त