‘स्वाक्षरी’वरून कळतात तुमच्या आई, वडील आणि जोडीदाराबद्दलच्या ‘भावना’, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात

पोलीसनामा ऑनलाइन – सहीमध्ये लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो आणि त्यांचा क्रमांचा पण साधारणपणे आपल्या सहीचे पहिले अक्षर हे आपल्या नावाचा प्रारंभिक (initial) किंवा पूर्ण नाव असते आणि त्यावरून तो व्यक्ती स्वतःबद्दल सांगत असतो. सहीमधला दुसरा भाग म्हणजे वडिलांचे किंवा नव-याचे प्रारंभिक (initial) किंवा पूर्ण नाव असते. लिहिणाऱ्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीबद्दलच्या भावना सांगत असतात.

आजच्या नवीन पिढीमध्ये वडिलांचे नाव किंवा (initial) सहसा दिसून येत नाही याचा अर्थ असा होतो, की अशी लोकं आपल्या वडिलांना कर्तबगार समजत नाहीत व त्यांचे करिअर त्यांच्या जन्मभूमीपासून इतर दुसऱ्या ठिकाणी आहे हे दिसून येतं, अशी लोकं साधारणपणे स्वप्न फार बघतात. नियोजन पण चांगलं करतात, परंतु ज्यावेळेस त्या कामाला पूर्णत्वाकढे नेतात तेव्हा हिम्मत हारतात म्हणून वडिलांचा (initial) सहीमध्ये असणे फार गरजेचे आहे. विवाहित स्त्रीच्या बाबतीत वडिलांऐवजी नव-याचा (initial) लिहिले पाहिजे, त्याला पण हाच नियम लागू होताे.

आडनावाबद्दल सांगायचं झालं तर आडनावाचे पहिले अक्षर तुम्ही कसे लिहिता त्यावरून तुमचे आणि तुमच्या आईचे नाते, विवाहित स्त्रीच्या बाबतीत सासूशी असणारे नाते कळत असते आणि आडनावाचा राहिलेला भाग हा त्या व्यक्तीच्या व्यवसायाबद्दल सांगत असतो. सहसा चांगल्या सहीसाठी तुमचे पूर्ण आडनाव हे सहीमध्ये यायलाच पाहिजे.

याव्यतिरिक्त या शब्दांचा क्रमांकही बदलतो. उदा. एखाद्या व्यक्तीने आडनाव पहिले लिहिले असेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीसाठी त्याची आई, बायको, बहीण म्हणजेच घराच्या स्त्री मंडळी या प्राथमिकता आहेत आणि आडनावाचे राहिलेलं (alphabets) त्याचा व्यवसाय दाखवतात म्हणजेच त्याचा व्यवसाय त्यांची प्राथमिकता आहे. एखादी गृहिणी जर का आडनाव पहिले लिहीत असेल, याचा अर्थ असा होतो की त्या स्त्रीसाठी तिचा परिवार, तिची मुलं सर्वस्वी आहेत.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः