नेमकं सत्य काय ?, मुख्यमंत्र्यांच्या समोरच अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं गाणं, जाणून घ्या (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या प्रचारासाठी प्रत्येकजण सध्या जोरात सोशल मीडियाचा वापर करत आहे. स्वतःच्या प्रचारासोबत इतरांचा चुकीचा प्रचार करण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार पद्धतीने व्हायरल होतोय. ज्यामध्ये अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मनसेचे गीत गाताना दिसून येताहेत.

 

हा व्हिडीओ जोरदार पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये अमृता फडणवीस या मनसेचं प्रचार गीत म्हणत आहेत आणि मुख्यमंत्री ते गाणं समोर बसून ऐकताहेत. एरवी सोशल मीडियावरून सर्वांना ट्रॉल करणाऱ्या सत्ताधारी भाजपला मात्र या व्हिडीओवरून चांगलेच ट्रॉल व्हावे लागत आहे.

मुळात हा व्हिडीओ मुंबई पोलिसांचा उमंग 2018 या कार्यक्रमातील असल्याचं समोर आलं. यामध्ये अमृता फडणवीस ‘फिर से’ हे गाणं गाताना दिसत आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल करताना याला पद्धतशीरपणे एडिट करून मूळ गीत काढून त्याजागी मनसेचे गीत लावल्याचे समजते आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्ष सोशल मीडियाचा कसा वापर करतील याचा काही नेम नाही.

कोहिनूर मिल कथित घोटाळ्यात ईडीची चौकशी झाल्याचा उल्लेख करत भाजपाने राज ठाकरेंना कोट्याधीश जादूगर अशी उपमा दिली होती. तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही पीएमसी बँकेबाबत सामान्यांना त्रास झाल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एक्सिस बँकेत खातं उघडावं, आपली बँक, वहिनीची बँक असं म्हणत भाजपावर पलटवार केला आहे.

अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. काही दिवसांपूर्वी भाजपने थेट व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे दोनीही पक्षांकडून सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटल्याचे दिसून आले होते.

 

Visit : policenama.com