साडीवरच महिलेने मारला जबरदस्त स्टंट, व्हिडीओचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महिला आणि साडी हे अनोखे समीकरण वर्षानुवर्षे चालत आले आहे. मात्र, सध्याच्या जमान्यात साडीत मला चालताही येत नाही अशी कुरबूर करणार्‍या मुलींना व्हायरल झालेला व्हिडिओ तोंडात बोट घालायला लावत आहे. तुम्हाला कुणी साडी नेसून एखादा स्टंट मारायला सांगितला तर, तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. मात्र आपल्याला अशक्य आणि कठीण वाटणारी ही गोष्ट महिलेने साध्य करून दाखवली आहे.

महिलेने साडी नेसून परफेक्ट फ्लिप मारून दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहूनही तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. निळ्या रंगाची साडी नेसलेली ही महिला आणि तिच्यासह एक ग्रे कलरचा सूट घालून तरुणही आहे. या महिलेचे नाव पारुल अरोरा तर पुरुषाचे नाव मायकेल होशियार सिंग आहे. दोघेही एकत्र फ्लिम मारुन स्टाइलमध्ये चालताना दिसत आहेत.

त्यावर अनेकांनी फायर, क्लॅपिंग, थम्ब्स अप इमोजी टाकले आहेत. अनेकांनी तिच्याकडून टीप्सही मागितल्या आहेत. काही महिलांनीदेखील आपल्याला साधे चालणेही शक्य होत नाही, असे म्हणतच महिलेला दाद दिली आहे