भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार कार्यालयावर मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय मजदुर संघच्या वतीने विश्वकर्मा जयंती भारती मजदुर संघातर्फे अखिल भारतीय स्तरावर साजरी करण्यात येते. यात विश्वकर्मा प्रतिमा पुजन तसेच संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न शासनासमोर सादर करण्यात येतात.

कामगाराचे शोषणच होते. शासन कामगार प्रश्नकडे दुर्लक्ष करते कामगारांना न्याय मिळावा या करीता आज मंगळवारी विश्वकर्मा जयंती निमित्त मजदुर संघाच्या वतीने सगळे कामगार जुनेधुळ कुंभारखुंट जवळील विश्वकर्मा भवनाजवळून विविध अशा 8 मागणीसाठी कामगार भवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुभाष चौक, नगरपट्टी, गांधीचौक, जुना आग्रारोड, फुलवाला चौक, कराचीवाला चौक, जुनी मनपा, झाशीराणी पुतळा, बर्वे छात्रालय मार्गाने येत मोर्चा पांझरा नदी किनारील कामगार कार्यालयावर येऊन धडकला. कामगार कार्यालयाजवळ कामगारांनी जोरदार घोषणा बाजी केली.

कामगारांच्या मागण्या –

1) 17 सप्टेंबर 2019 रोजी विश्वकर्मा जंयती कामगार दिन म्हणुन घोषित करावी. त्याप्रमाणे सार्वजनिक सुट्टी शासनाने जाहिर करावी.
2) शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, विजमंडळ, इमारत बांधकाम,( बी.ओ.सी.) टेलिफोन इ. केंद्र व राज्यशासनाच्या विभागात कॉन्ट्रँक्ट ( ठेकेदारी पध्दत ) काम करीत असलेल्या कामगारांना कायम करा. त्यांना किमान वेतन लागु करुन इतर शासनाच्या सेवा सवलती मिळाव्यात. टेलिफोन मधील कामगारांचे सहा महिन्यांपासुन बाकी वेतन तातडीने करावे.
3) धुळे व नंदुबार जिल्ह्याकरीता कामगार अधिकारी कायमस्वरुपी नियुक्त करावा. तसेच कामगार कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत.
4) मान्यताप्राप्त संघटना शासनाच्या विविध अभियानात (नोंदणी) सामील करून घेण्यात यावेत जिल्ह्यात प्रामुख्याने सामील करण्यात आले नाही.
5) इमारत व बांधकाम मंडळातील कामगारांना पंतप्रधान आवास योजना मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना तातडीने न्याय मिळावा तसेच अवजार खरेदी शैक्षणिक शिष्यवृत्ती कामगारांचे विवाहाचे प्रकरणे तातडीने निकाली काढावेत.
6) ज्या कामगारांची अभियानांतर्गत अद्यापपर्यंत नोंदणी झालेली नाही त्या कामगारांचे तातडीने नोंदणी करावी.
7) जिल्ह्यात ग्रामपंचायत नगर परिषद लोकसभा इतर निवडणुका नियमितपणे वर्षभर चालू आहेत त्यामुळे सारखी आचारसंहिता चालू असल्यामुळे कामगारांना सभा सदस्यत्व नूतनीकरण करण्यास विलंब झाला आहे सदर विलंब माफ करून कामगारांचे नूतनीकरण करावे.
8) मंत्री महोदय लोकप्रतिनिधी यांनी आदेश करून सुद्धा संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात आली नाही. या बाबतीत कुठलाही आदेश करण्यात आलेला नाही.

अशा विविध मागणीचे निवेदन कामगार अधिकारी यांना शिष्टमंडळ देण्यासाठी गेले. कामगार अधिकारी कार्यालयात नसल्याने तेथील कर्मचारी यांचे हातत निवेदन देत घोषणा देत शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांचे दालनात गेले. त्यांना निवेदन देत मागण्या त्वरीत मान्य व्हाव्यात अशी मागणी केली.

यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाने आचारसंहिता घोषित होण्या अगोदर मागण्या मान्य कराव्या असे सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हाध्यक्ष सुनिल देवरे, सेक्रेटरी घनशाम जोशी, संघटक बी.एम.कुलकर्णी, उपाध्यक्ष पी.के.मदाने, बी एन पाटील, अनिल पोतदार, रियाज पठाण, नारायण बडगुजर, लोटन मिस्तरी, गुलाब भामरे, हरी धुर्मेकर, सतिष जाधव, विलास सोनवणे, श्रीराम खैरनार, किशोर सोनवणे, हेमंत कोळी आदी केली. यावेळी मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी झाले होते.

You might also like