सलमान खानच्या ‘Kick -2’मध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खानच्या चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथे राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेने फिर्य़ाद दिली असून या महिलेची 1 लाख 82 हजार 600 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 15 जून ते 6 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचा बहुर्चित किक -२ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. फिर्यादी महिलेला जूनमध्ये एका अनोळखी व्यक्तीने फोन करून त्यांना या चित्रपटाच्या कास्टिंग करत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चित्रपटात सहाय्यक भूमिका देतो असे सांगितले, तसेच महिलेच्या भावाला देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर महिलेकडून कामाच्या बहाण्याने विविध कारणे सांगून तिला बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. चित्रपटात काम मिळणार असल्याने आणि भावाला देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळणार असल्याने महिले आरोपीने सांगितेलेल्या बँक खात्यावर पैसे भरले. काही दिवसांनी कामाबाबत चौकशी करण्यासाठी महिलेने आरोपीला फोन केला असता फोन बंद लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक ए.व्ही. कदम करीत आहेत.

Loading...
You might also like