Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fruits For Heart Attack | हार्ट पेशंटला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पहिला अ‍ॅटक ( Heart Attack) येऊन गेला असेल तर पुन्हा हा त्रास होऊ नये यासाठी त्यांना आहाराची विशेष काळजी (Heart Attack Dietary Care) घ्यावी लागते. यामुळेच योग्य वेळी खाण्यापासून आहारात फळे आणि भाज्यांच्या सेवनाकडेही लक्ष दिले जाते. हार्टच्या रुग्णांनी कोणती फळे खावीत, जेणेकरून अटॅकचा धोका कमी होतो आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol Level) संतुलित राहते ते जाणून घेवूयात (Fruits For Heart Attack)…

 

1. आहारात बेरीचा समावेश करा (Include Berry In Diet)
ज्या लोकांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांनी त्यांच्या आहारात नियमितपणे बेरीचा समावेश करावा. याच्या सेवनाने हृदय सुरक्षित राहते आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तणाव कमी करतात (Fruits For Heart Attack).

 

2. रासबेरी हृदय सुरक्षित ठेवेल (Raspberries Keeps Heart Safe)
याशिवाय रासबेरी हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. लहान दिसणारे हे फळ जिभेवर ठेवताच सहज विरघळते. ते खाल्ल्याने हृदयापर्यंत रक्त पोहोचणार्‍या नसा तंदुरुस्त राहतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

3. द्राक्षे देखील फायदेशीर (Grapes Are Also Beneficial)
हृदयासाठी द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल आणि फिनोलिक अ‍ॅसिड्सचे (Polyphenols And Phenolics Acid) प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. या फळामध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties) असतात, जे हृदय निरोगी ठेवतात.

 

4. सफरचंद हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर (Apples Are Beneficial For Heart Patients)
याशिवाय हृदयरोगी त्यांच्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतात. ते खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. सफरचंद हे हृदयरोग्यांसाठी रामबाण औषध असल्याचे मानले जाते. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदयात ब्लॉकेज सारख्या समस्या आहेत त्यांनी दररोज एक सफरचंद खावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

 

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

 

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात