Immunity : सोया फुड्समध्ये इम्युनिटीचा खजिना, FSSAI ने दिला डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शरीरात फायबर बूस्ट करण्यासाठी प्लांट प्रोटीन सर्वात चांगला स्त्रोत मानला जातो. इम्यूनिटी सुधारण्यासाठी फायबर आणि प्रोटीनचे योग्य सेवन आवश्यक आहे. सोया फुड्स हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने आपल्या एका ट्विटर पोस्टवर सोया फुडच्या फायद्याबाबत माहिती दिली आहे. एफएसएसएआयनुसार, सोया फुड्स सोयाबीनद्वारे तयार होते.

सोयाबीनचे फायदे
एफएसएसएआयनुसार सोया प्रॉडक्ट्समध्ये खुप जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आढळते. याशिवाय यामध्ये शरीरासाठी आवश्यक ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड सुद्धा आढळते. हे पूर्णपणे लॅक्टस आणि ग्लूट फ्री असते. यात सॅच्युरेटेड फॅटसुद्धा खुप कमी असते.

डाएटमध्ये असा करा समावेश
सोयाबीनचा अनेक प्रकारे आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता. तुम्ही सोया ग्रॅनुएल, नगलेट, टोफू, सोया मिल्क, सोया आटा आणि सोया नट्स सुद्धा सेवन करू शकता. हा शरीरात प्रोटीन आणि फायबरची कमतरता पूर्ण करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे.