Metoo चं वादळ धडकलं ‘एफटीआयआय’च्या वेशीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराला जगासमोर आणत आहेत. #MeToo ही लैंगिक शोषणाविरोधातील मोहीम जोर धरू लागली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या #MeToo या चळवळीचं लोण महाविद्यालयांपर्यंत पोहोचलंय.

देशातील विविध क्षेत्रांतील महिलांनी पुढे येऊन गेल्या काही दिवसांत ‘मी-टू’ चळवळीच्या माध्यमातून आपल्याबाबतीत घडलेले लैंगिक शोषणाचे अनुभव शेअर करून आणि अनेक नामवंत व्यक्तींची शोषणकर्ते म्हणून नावे घेऊन मोठीच खळबळ उडवून दिली आहे. त्यात आता ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (‘एफटीआयआय’ ) चीही भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यन्त बॉलीवूडमध्ये सुरु झालेली ही मोहीम आता बॉलीवूड प्रशिक्षण संस्थेपर्यंत येऊन ठेपली आहे.

एफटीआयआय’च्या माजी विद्यार्थिनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये २०११मध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87c41803-d070-11e8-a09f-e7c5ff29a32e’]

एफटीआयआय’च्या एका माजी विद्यार्थिनीने आपल्या फेसबुक पेजवर काही वर्षांपूर्वी ती संस्थेत शिकत असतानाचे काही नकोसे अनुभव शेअर केले आहेत. तिला लैंगिक शोषणासोबतच वर्णभेद आणि लिंगभेदाचेही काही गंभीर अनुभव आल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर अनेक विद्यार्थिनी आपापले अनुभव सांगत व्यक्त झाल्या आहेत. अनेक जणींनी या वेळी लिंगभेदाचा अनुभव शेअर केला आहे. तसेच, एका विद्यार्थिनीने आपले लैंगिक शोषण झाल्याचेही म्हटले आहे. तसेच, अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल करूनही आपल्याला न्याय न मिळाल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील विद्यार्थिनींनी देखील लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात पुढे येऊन आवाज उठवला होता. या प्रकारांमुळे पुण्यातील शिक्षणसंस्था मुलींसाठी सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[amazon_link asins=’B01D2IBM5S,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9170c037-d070-11e8-affe-852814dec184′]

दरम्यान, याआधीही ‘एफटीआयआय’मधील एका अतिथी प्राध्यापकाच्या विरोधात काही विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्याचा प्रकार घडला होता. तर, सहा-सात महिन्यांपूर्वीही संस्थेत लैंगिक शोषणाच्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनींचे शोषण करणाऱ्या एकाच व्यक्तीविरोधात एकाच महिन्यात चार वेगवेगळ्या तक्रारी आल्याची माहितीही या वेळी पुढे आली होती. त्यानंतर ‘एफटीआयआय’मधील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या लैंगिक शोषणविरोधी अंतर्गत तक्रार समितीने या तक्रारीची दखल घेऊन त्याबाबत योग्य ती कारवाईही केल्याचे संस्थेच्या प्रशासनातर्फे कळविण्यात आले होते. संस्थेतील एकूण वातावरणाविषयी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्या वेळी काही विद्यार्थिनींशी संवाद साधला असता, ‘माझ्या काही मैत्रिणींना काही वाईट अनुभव आले आहेत; ज्याविषयी मी अधिक काही सांगणे योग्य ठरणार नाही,’ असे एका विद्यार्थिनीने म्हटले होते.

[amazon_link asins=’B06Y5HD2T7,B073WX582T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6a22a27-d070-11e8-bcfb-735d9d49c276′]