एफटीआयआयचा ‘तो’ विद्यार्थी सापडला

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेला राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफ टीआयआय) तो विद्यार्थी पोलिसांना सापडला आहे.  एफटीआयआयमधील आर्ट डिरेक्शन विभागातील प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केल्याने तो नाराज होता. त्यामुळे उत्तरप्रदेशातील त्याच्या मावशीच्या गावी कोणालाही काही न सांगता निघून गेला होता.

मनोज कुमार (वय ३१,मूळ रा. वाराणसी, उत्तरप्रदेश) एफटीआयआय संस्थेतील कलादिग्दर्शन विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. विभागातील प्राध्यापकाशी  गैरवर्तन केल्या प्रकरणी मनोज कुमार आणि श्रीनिवास या दोघांवर प्रशासनाने कारवाई केली होती. त्यानंतर दोघांना संस्थेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर हे दोघेही संस्थेत होते. मात्र, ज्या दिवाशीया प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हा श्रीनिवास मूळगावी जातो, असे सांगून संस्थेतून बाहेर गेला. मात्र मनोजकुमार त्या दिवसापासून संस्थेतून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. तो बेपत्ता आहे, अशी माहिती ‘एफटीआयआय’ प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्या मित्र, नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र मिळून आला नाही. परंतु तो उत्तरप्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील जयसिंपुर येथे त्याच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. तो कारवाई केल्याने निराश झाल्याने निघून गेला होता. त्याचा मोबाईल हरविल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी  व्हिडीओ कॉलिंग करून संपर्क साधला आहे. अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.