FTII च्या विद्याार्थिनीला चाकूच्या धाकाने लुटले

पोलीसनामा ऑनलाईन टीम – एफटीआयआय संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्याार्थिनीला चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हि घटना विधी महाविद्याालय रस्त्यावर घडली. चोरट्यांनी तरुणीजवळील रोकड, मोबाईल असा मुद्देमाल नेला.

याप्रकणी ३१ वर्षीय विद्याार्थिनीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याार्थिनी आणि तिचा सहकारी मध्यरात्रीपर्यंत संस्थेत चित्रीकरण करत होते. त्यानंतर विद्याार्थिनी आणि तिच्या बरोबर असलेला एक सहकारी पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी संस्थेतून बाहेर पडले.

विधी महाविद्याालय रस्त्यावर कॅफे कॉफी डे समोर दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडविले. तसेच विद्याार्थिनीला कोयत्याचा धाक दाखविला. तिच्याकडील ८०० रुपयांची रोकड, मोबाईल कागदपत्रे असा ९ हजारा ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी तपास करत आहेत.

Visit : Policenama.com