एफटीआयआय मधील विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-एफटीआयआयमधून सस्पेंड करण्यात आलेला आर्ट डिरेक्शनच्या द्वितिय वर्षातील विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्याला २४ डिसेंबर रोजी एफटीआयआयमधून सस्पेंड करण्यात आले होते.

मनोज कुमार असे त्याचे नाव आहे. तो मुळचा वाराणसीचा असून त्याचे नुकतेच सहा महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. तो एफटीआयआयमध्ये आर्ट डिरेक्शनच्या २०१६ च्या बॅचचा विद्यार्थी आहे. १९ डिसेंबर रोजी आर्ट डिरेक्शन आणि प्रॉडक्शन विभागामध्ये त्याने विद्यार्थ्यांसोबत मिळून प्राध्यापक व विभाग प्रमुखांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अमित त्यागी यांनी पत्र काढून त्याला सस्पेंड केल्याचे सांगितले होते. तेव्हापासून तो नाराज होता. मात्र मागील चार दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने कतरडेक्कन पोलिस ठाण्यात यासंदर्भात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे.

You might also like