Fu Bai Fu | ‘जिथे असाल तिथे हसाल’; मराठमोळे उमेश कामत आणि निर्मिती सावंत दिसणार नव्या भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu) या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना एक वेगळीच ओळख करून दिली आहे. पुन्हा एकदा हा कार्यक्रम नव्या रूपात नव्या ढंगात संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल 9 वर्षांनी फू बाई फू (Fu Bai Fu) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉमेडीच्या हरहुन्नरी कलाकारांची विनोदी शैली पहायला मिळणार आहे.

 

‘जिथे असाल तिथे हसाल’ ही संकल्पना घेऊन यंदा ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Actress Vaidehi Parasurami) पार पाडणार आहे. या निमित्ताने वैदेही परशुरामी टेलिव्हिजनवर पदार्पण करेल. या कार्यक्रमात परिक्षणाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेता उमेश कामत (Actor Umesh Kamat) आणि कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत (Comedy Queen Nirmiti Sawant) पार पडणार आहेत.

या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार हजेरी लावणार याची उत्सुकता अनेक लोकांना लागून राहिली आहे.
“फु बाई फू” 3 नोव्हेंबर पासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.
त्यामुळे प्रेक्षकांसाठी हि एक मेजवानीच म्हणावी लागेल.

 

Web Title :- Fu Bai Fu | actor umesh kamat and comedy queen nirmiti sawant in fu baaai fu show

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला