Fuel – Gas Prices | महागाईचा भडका ! इंधनासह स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Fuel – Gas Prices | इंधन दराची वाढ सुरूच असुन बुधवारीही पेट्रोल २४ ते ३० तर डिझेल ३२ ते ६० पैशानी महागले. त्यातच स्वयंपाकाच्या गॅस दरातही वाढ करण्यात आली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित गॅसच्या किमतीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅससाठी आता ९२६ रुपये मोजावे लागणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. दरम्यान, जाणकारांच्या मते, जागतिक बाजारातील दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे इंधन दर आणि गॅस दरात वाढ (Fuel – Gas Prices) होत आहे.

गेल्या काही दिवसापासून इंधनदरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारीही पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात वाढ केल्याने देशातील इंधनाचे दर सार्वकालिक उच्चांकावर गेले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ शहरानुसार भिन्न आहे. दिल्लीत पेट्रोल ३० पैशांनी वाढून १०२.९४ रुपये लिटर झाले. डिझेल ३५ पैशांनी वाढून ९१.४२ रुपये लिटर झाले.
मुंबईत पेट्रोल २४ पैशांनी वाढून १०८.६७ रुपये लिटर, तर डिझेल ३२ पैशांनी वाढून ९८.८० रुपये लिटर झाले.
चेन्नईत पेट्रोल २६ पैशांनी वाढून १००.४९ रुपये लिटर, तर डिझेल ३४ पैशांनी वाढून ९५.९३ रुपये लिटर झाले.
कोलकात्यात पेट्रोल २९ पैशांनी वाढल्यानंतर १०३.६५ रुपये लिटर झाले. डिझेल ३६ पैशांनी वाढून ९४.५३ रुपये लिटर झाले. (Fuel – Gas Prices)

 

गॅस दरात दर महिन्याला सुधारणा करण्यात येते. बुधवारी गॅसच्या दारात १५ रुपयांची वाढ करण्यात आली.
जुलै महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ९० रुपयांची वाढ झाली आहे.
दरवाढ झाल्यानंतर मुंबईमध्ये १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ९२६ रुपये झाली आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महागले होते.
त्याआधी १७ ऑगस्ट रोजीही गॅस २५ रुपयांनी महागला होता.

 

Web Title : Fuel – Gas Prices | rising fuel and gas prices new gas price rs 925 and petrol 108 rs per litter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र, NDA नंतर RIMC आणि RMS मध्ये सुद्धा मुलींना मिळणार प्रवेश

Earn Money | घरबसल्या फक्त 5000 रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या कशी करावी सुरुवात?

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार