Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

नवी दिल्ली : Fuel Price | इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमुळे (Fuel Price) देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. इंधनाच्या किंमती वाढल्याने महागाई (Inflection) सातत्याने वाढत चालली आहे. सर्वसामान्य जनतेसह विरोधी पक्ष सतत सरकारला इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची मागणी करत आहे. कारण सरकारने पहिल्या लॉकडाऊनमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होऊनही किमती स्थिर ठेवत उत्पादन शुल्क वाढवले होते.

आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी इंधनाच्या किंमती का कमी करता येत नाहीत याचे कारण सांगितले आहे. सोबतच इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले जाणार नसल्याचे म्हटले.

केंद्र आणि राज्यांशिवाय शक्य नाही
सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले, यूपीए सरकारने 1.44 लाख कोटी रुपयांचे बाँड जारी करून इंधनाच्या किंमती कमी केल्या होत्या. मागील यूपीए सरकारने खेळलेली चालबाजी करता येऊ शकत नाही. ऑयल बाँडमुळे आमच्या सरकारवर भार आला आहे, यासाठी आम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करू शकत नाही.

अर्थमंत्री म्हणाल्या, लोकांनी चिंतीत होणे स्वाभाविक आहे. जोपर्यंत केंद्र आणि राज्य मार्ग काढत नाहीत, यावर तोडगा निघणार नाही.

व्याजापोटी दिले 70 हजार कोटी
अर्थमंत्री म्हणाल्या, सध्या इंधनावर उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाणार नाही. यूपीए
सरकारद्वारे जारी तेल बाँडचे व्याज भरावे लागत असल्याने सरकारी खजिन्यावर भार आला आहे.
सरकारने मागील 5 वर्षात तेल बाँडच्या व्याजासाठी 70,195.72 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे भरले
आहेत.

त्यांनी म्हटले, आम्हाला अजूनही 2026 पर्यंत 37,000 कोटी रुपयांचे व्याज द्यायचे आहे. व्याज
भरण्याशिवाय, 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मुळ रक्कम अजूनही प्रलंबित आहे. जर
माझ्यावर तेल बाँडचा भार नसता तर मी इंधनावरील शुल्क कमी करण्याच्या स्थितीत असते.

हे देखील वाचा

Maharashtra Unlock | 18 वर्षाखालील मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी, मॉल्समध्ये खुशाल फिरा, नवीन नियमावली जाहीर

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Fuel Price | finance minister nirmala sitharaman told why fuel prices are not being reduced this is the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update