दरवाढीचा भडका ! पेट्रोल-डिझेलच्या दरात महिनाभरातील मोठी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. थर्टीफस्टला अनेक जण सेलिब्रेशनसाठी बाइकने तसेच कार ने बाहेर फिरायला जात असतात. आता त्यांना या दरवाढीमुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतीत १६ ते १७ पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर १८ ते १९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत पेट्रोल ८०.६९ आणि डिझेल प्रति लीटर ७१. १२ रुपये झाले आहे. ही दरवाढ होण्यामागचे कारण म्हणजे जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलची एका दिवसातील ही मोठी दरवाढ आहे. ही दरवाढ होण्याचे कारण म्हणजे जागतिक कमोडिटी बाजारात  क्रूड ऑइल (खनिज तेल) ६५ डाॅलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहे. त्यामुळे साहजिकच तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ झाली आणि त्यातूनच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली.

इंडियन ऑईलच्या दरपत्रकानुसार दिल्लीत पेट्रोल ७५.०४ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर ६७.७८ रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर ८०.६९ रुपये तर डिझेलचा दर प्रति लीटर ७१.१२ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७८.०२ रुपये तर डिझेल ७१.६७ रुपये आहे. तसेच कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ७७.७० रुपये आणि डिझेलसाठी ७०.२० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. एकंदरीत देशभरात या दरवाढीमुळे लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/