नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fuel Tax Update | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधनावर (ATF) लावलेल्या नवीन कराचा सरकार आता दर 15 दिवसांनी आढावा घेईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे (Fuel Tax Update). आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन दर पंधरा दिवसांनी करांचा आढावा घेतला जाईल. चिंतेची बाब म्हणजे, या तिमाहीत महागाईचा दरही आरबीआयच्या अंदाजित लक्ष्यापेक्षा जास्त आहे (FM On Fuel Tax).
अर्थमंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट
अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा कठीण काळ आहे आणि जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत. आम्ही निर्यातीला परावृत्त करू इच्छित नाही परंतु देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध झाले नाही आणि निर्यातीत वाढ होत राहिली तर त्यातील काही भाग आपल्या नागरिकांसाठीही ठेवावा लागेल. (Fuel Tax Update)
पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनावर निर्यात टॅक्स
यापूर्वी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरही कर लागू करण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर 6 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये प्रति लिटर दराने कर लावण्यात आला आहे. हा नवा नियम 1 जुलैपासून लागू झाला आहे.
स्थानिक पातळीवर उत्पादित तेलावरही टॅक्स
यासोबतच ब्रिटनप्रमाणे स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेलावरही कर लावण्यात आला होता.
देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर प्रतिटन 23,250 रुपये कर लावण्यात आला आहे.
महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, नवा कर सेझ युनिट्सवरही लागू होईल, परंतु त्यांच्या निर्यातीवर कोणतेही बंधन नाही.
यासोबतच रुपयाच्या घसरणीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सरकार आयातीवर रुपयाच्या मूल्याच्या परिणामाबाबत पूर्णपणे सावध आहे.
Web Title :- Fuel Tax Update | fm nirmala sitharaman on petrol price govt to review new taxes levied on crude diesel atf every fortnight
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update