फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फुल फॅट असलेले दूध आरोग्यासाठी घातक असल्याचे आतापर्यंत ऐकले होते. परंतु, आता एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कॅनडातील या संशोधकांनी म्हटले आहे की, दिवसातून तीनदा फुल फॅटचे दूध वा दुग्धजन्य उत्पादने सेवन करणाऱ्यांना लवकर मृत्यू, हृदयाचे आजार व उष्माघाताचा धोका कमी होतो.

फुल फॅटच्या दुधात व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम व प्रोटीनसह अनेक पौष्टिक घटक असतात. या संशोधनामुळे पूर्वी अमेरिकी बाजारात या दुधाची घटलेली विक्री आता वाढत आहे. इंटरनॅशनल डेअरी फूड्स असोसिएशनच्या (आयडीएफए) उपाध्यक्ष केरी फ्राय यांनी सांगितले की, ग्राहक आता अधिक फॅट असलेल्या दुधाची मागणी करू लागले आहेत.

चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांना हृदयाचे आजार, टाइप-२ चा मधुमेह व स्थूलतेचा धोका कमी असतो. कमी फॅट सेवन करणारे कमी कॅलरीची भरपाई खराब रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून करतात, असेही नव्या संशोधनात म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like