आज दिसणार्‍या ‘फुल हार्वेस्ट मून’मुळं ‘हा’ देश एकदम भयभीत, होणार 900 दशलक्ष डॉलरचं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या दिवशी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी अवकाशात एक वेगळेपण आपल्या सगळ्यांना पहायला मिळणार आहे. ते म्हणजे आज सर्वजण चंद्राचे पूर्ण रूप पाहू शकणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार याला ‘फुल हार्वेस्ट मुन’ असेही म्हणतात.

एरवी सूर्यास्त ५० मिनिटांनी होतो मात्र आज सूर्यास्त अवघ्या ५ मिनिटात होणार आहे. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान लोक हा चंद्र पाहू शकतात असे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अमेरिकन संस्कृतीमध्ये फुल हार्वेस्ट मुनला अशुभ मानले जाते. प्राचीन काळात हा चंद्र शेतीसाठी फायद्याचा ठरत होता असा एक समजही अमेरिकन लोकांमध्ये होता.

नेहमीपेक्षा वेगळा असेल आजचा चंद्र
नेहमीच्या पूर्ण चंद्रपेक्षा आजचा चंद्र छोटा दिसणार आहे.
मायक्रो मुन आणि सुपर मुनपेक्षा १४ टक्के लहान आणि ३० टक्के कमी प्रकाशित असणार.
पृथ्वीपासून हा चंद्र २,५१,६५५ मैल इतका लांब असणार आहे.

अमेरिकेत हा दिवस सगळ्यात भयानक मानला जातो त्यामुळे या दिवशी लोक कोणताही व्यवहार करणे टाळतात. त्यामुळे जगभरात जवळजवळ ८०० ते ९०० दशलक्ष डॉलरचा व्यवहार होत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –