भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी निधी देणार : पर्यटनमंत्री रावल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्‍टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. पर्यटनमंत्री रावल यांनी भुईकोट किल्ल्यातील सभागृहात पर्यटन विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी मंत्री रावल बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे,सहायक नियोजन अधिकारी दीपक दातीर, महापौर बाबासाहेब वाकळे, कर्नल समीत वर्मा, कर्नल तांबोळी, इतिहासतज्ज्ञ भूषण देशमुख, अभिजित लुणिया आदींसह अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुईकोट किल्ल्यात आल्यानंतर पर्यटनमंत्री रावल यांनी प्रथम नेता कक्षास भेट दिली. या ठिकाणी दिशादर्शक फलकाचे अनावरण केले. हा फलक भूषण देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. प्रास्ताविक करताना जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांनी जिल्ह्यातील ४९ पर्यटन विकास कामांची माहिती देताना यासाठी ८८ कोटींची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. भुईकोट किल्ल्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती दिली. उर्वरित कामासाठी निधी आवश्‍यक असल्याचे भदाणे यांनी दिले.

या बैठकीत माजी खासदार गांधी, येलुलकर यांनी देखील शहरासह जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक वारसा निदर्शनाला आणून देत, विकासासाठी निधीचे पाठबळ आवश्‍यक असल्याचे साकडे पर्यटनमंत्र्यांना घातले. यासंदर्भात बोलताना पर्यटनमंत्री रावल यांनी एक कोटी ६२ लाख ५० हजार रूपयांचा निधी भुईकोटच्या विकासासाठी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली. यापैकी ४० लाख रूपयांचा निधी भुईकोट किल्ल्याच्या भिंतीवर विद्युत प्रकाशझोत कामांसाठी २० लाखांचा निधी नेताकक्षातील राष्ट्रीय नेत्यांच्या संदर्भात अद्ययावत ऑडिओ सिस्टिम साठी देण्यात आला. अडीच लाखांचा निधी जिल्हा पर्यटन नकाशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भूषण देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्हा पर्यटन स्थळांच्या १० हजार प्रति छापून नागरिकांना माहितीस्तव देण्याची सूचना रावल यांनी केली.

पर्यटनाच्या कामात सूसुत्रता येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा पर्यटनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची बैठक चार दिवसांपूर्वी लोणावळा येथे घेण्यात आली. असल्याची माहिती रावल यांनी यावेळी दिली. तसेच जिल्हा पर्यटन नकाशासाठी अडीच लाख रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भातील डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like