गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित पवार

पुणे : गावच्या विकासातून ( village development ) आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी गावच्या विकासासाठी ( village development ) निधी कमी पडू दिला जाणार नाही. मागिल पाच वर्षांत चांगले करून मतदारांचा विश्वास निर्माण केला, ही कौतुकास्पद बाब आहे, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान पॅनलच्या सुनीता दत्तात्रय आवाळे, ज्योती दीपक आवाळे, रोहिणी रमेश खोमणे, फक्कड तुकाराम बालगुडे, सारिका धनंजय आटोळे, नितीन नारायण भिसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान पॅनलप्रमुख दत्तात्रय रामभाऊ आवाळे, रमेश साबळे, बापू वंदन बिबे, राजेंद्र गणपत आटोळे, संतोष दशरथ आटोळे, विठ्ठल मारुती आटोळे, दत्तात्रय वीरकर, गणेश विरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.