…म्हणून महिलांवर आली स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळं देशात अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. नोकऱ्या गेल्यानंतर काहींनी मिळेल ते काम केलं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी 2 महिलांवर स्मशानभूमीत काम करण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील ही घटना आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 2 महिला गेल्या काही महिन्यांपासून जौनपूरमधील एका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यानं महिला हे काम करत आहेत. कही ठिकाणी महिलांना स्मशानभूमीत सहसा जाऊ दिलं जात नाही. मात्र आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी महिला हे काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या गंगा गोमतीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत लोक अंत्यसंस्कारासाठी येत असतात.

सर्वांचा विरोध सहन करत काम करणं सुरूच ठेवलं

रोज जवळपास 8-10 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. या सर्व मृतहेदांची जबाबदारी या 2 महिलांवर असते. सुरुवातीला तर महिला मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्यानं काही लोकांनी त्यांना विरोध केला. मात्र या दोनही महिलांनी सर्वांचा विरोध सहन करत आपलं काम करणं सुरू ठेवलं. महिलेच्या पतीचं निधन झाल्यानं घरची सर्व जबाबदारी ही त्यांच्यावर पडली आहे. त्यांच्याकडे पोट भरण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं, शेतजमीन देखील नव्हती.