Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये असे झाले अंत्यसंस्कार, Live व्हिडीओ पाहून आश्रूंनी दिला ‘निरोप’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   लॉकडाऊनचा परिणाम आता जीवनासोबत मृत्यूवरही होताना दिसून येत आहे. अशी एक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर शेवटच्या भेटीपासून अंत्यसंस्कार पर्यंत सर्व काही कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्ण केले गेले. देश – परदेशातील नातेवाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच मृताला शेवटचा निरोप देत होते.

हरियाणाच्या यमुनानगरमधील प्रेम नगर कॉलनीत राहणाऱ्या एका कुटुंबाने असे काही केले ज्यानंतर ते देशासाठी एक अनन्य उदाहरण बनले आहे. दरम्यान या कुटुंबातील आजीचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. त्यांनतर त्यांचे शेवटचे दर्शन त्यांच्या देश – विदेशातल्या नातेवाईकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतले. मांडीवर खेळत मोठी झालेली ती मुले आज देशात व परदेशात जाऊन बसली आहेत. ते मोबाइल फोनच्या स्क्रीनवर आपल्या आजीला बघून अश्रू ढाळताना दिसत आहेत.

कुटुंबाने परस्पर करारानुसार निर्णय घेतला होता की प्रत्येकजण लॉकडाऊन दरम्यान सामाजिक अंतर राखेल. त्यामुळे त्यांचे अलाहाबाद, मुंबई तसेच विदेशातील नातेवाईक यमुनानगरला येण्याचा प्रयत्न करणार नाहीत. त्यांनी ठरवले की व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजीच्या शेवटच्या दर्शनापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत थेट प्रक्षेपण पाहतील. आणि ऑनलाइनच शेवटचा निरोप देतील.

मृताचा नातू विनोद कुमार यांनी सांगितले की, बुधवारी अचानक त्यांच्या आजीचा मृत्यू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अलाहाबाद, मुंबई, ऑस्ट्रेलिया आणि कॅलिफोर्निया, उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या नातेवाईकांना अखेरचे दर्शन देण्यात आले. अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण केले गेले.