कौतुकास्पद ! धुळ्यात तृतीयपंथियांकडून ‘कोरोना’बाधितावर अंत्यसंस्कार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकच पाठ फिरवत असल्याची अनेकदा दिसून आले आहे. मात्र या काळात माणुसकीचा प्रत्यय दाखवणारी अनेक उदाहरणे समोर आली. धुळ्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर तृतीय पंथीयांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोनाबद्दलची भीती दूर करून नातेवाईकांना शेवटच्या क्षणी तरी बेवारस सोडू नका असा संदेश त्यांनी दिला आहे. शहरातील जुने धुळे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी तृतीयपंथीय समाजाचे महामंडलेश्वर रवी नाथजोगी तसेच यलम्मा रेणुका देवी मंदिराच्या जोगतींनी स्वतःहून दखल घेतली. कुठल्याही प्रकारची कोरोनाची भीती न बाळगता बाधित मृत व्यक्तीवर विधीवत अंत्यसंस्कार केले. यावेळी त्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न घाबरता अंतिम संस्कार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर, महानगर पालिका कर्मचारी भरत येवलेकर, महेंद्र साळवे, रुग्णवाहिकेचे चालक अबू अन्सारी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like