महाराष्ट्रात नव्या आजाराचा धोका? ‘या’ 2 विभागात म्युकोरमायकोसिसचं वाढतेय संक्रमण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या महामारीत अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जे लोक कोरोनाच्या विळख्यातून सुटून बरे होऊन घरी गेले आहेत असे लोक आता म्युकोरमायकोसिस या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचा प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. म्युकोरमायकोसिस हा आजार भविष्यामध्ये साथीच्या आजारासारखं संक्रमण करू शकतो. याबद्दल धास्ती डॉक्टरांच्यात निर्माण होत आहे.

म्युकोरमायकोसिस या गंभीर आजाराच्या तीव्रतेमुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता फक्त ५० % टक्के एवढी असते. तर म्हणून अंधत्त्व आणि अन्य गंभीर आजार देखील होऊ शको. डॉक्टरांच्या माहितीनुसार, एक गंभीर बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे वाढत्या रुग्णांची संख्या पाहता हा आजार साथ पसरवू शकतो. अशा रुग्णांचा आकडा वाढत जात असल्याने सध्या दोन्ही म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. या आजारावरील औषधे अधिक महाग आहेत. अशा आजाराच्या फैलावामुळे म्युकोरमायकोसिसचा संसर्ग महाराष्ट्रासाठी नवा धोका निर्माण करत आहे. या दरम्यान, सध्या मी दैनंदिन म्युकोरमायकोसिसचे २ नवे रुग्ण आढळत असल्याचे पाहत आहे. तर याचा प्रभाव वाढल्यास त्यांच्यावर उपचार कसे करायचे, ही समस्या असेल. कारण अँटी-फंगल रोगांवरील औषधांचा फक्त तुटवडाच नाही तर ही औषधेही अधिक महाग आहेत असे डॉक्टर संजीव झांबाने सांगितले आहे.

आता मुंबई येथे परळ मध्ये म्युकोरमायकोसिसवर उपचार होणारे एकमेव स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या रुग्णालयामध्ये म्युकोरमायकोसिसच्या ३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच यामधील २५ हे मुंबईच्या बाहेरील आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसचा संक्रमण गतीने वाढत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने गतीने ह्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिलिंद नवलाखे यांनी म्हटले आहे. तसेच, तर किमी हॉस्पिटलमध्ये आताच्या स्थितीला म्युकोरमायकोसिसचे २५ रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईच्या बाहेरील आहे. आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. म्युकोरमायकोसिसच्या संक्रमणाला साधारण नाकापासून सुरुवात होते. हा संक्रमण संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरतो, तसेच मेंदूपर्यंत गेल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, नशीब माहिती डॉक्टर मारफातिया यांनी दिली आहे.