VIDEO : क्रिकेटच्या इतिहासात असा हास्यास्पद रनआऊट तुम्ही कधीच पाहिला नसेल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट हा चमत्काराचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी सामना फिरून पराभूत होणारा संघ देखील विजयी होऊ शकतो. तसाच एक प्रकार इंग्लडच्या एका काऊंटी सामन्यात घडला. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्क कॉसग्रोवचा धावबाद होतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्क कॉसग्रोव याने फटका खेळाला. मात्र त्याने टोलवलेल्या चेंडू थेट स्लिपमधल्या खेळाडूकडे गेला. मात्र त्याला ते लक्षात आले नाही. त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तो विचित्र पद्धतीने धावबाद झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ बघून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. मात्र या व्हिडिओमधील फिल्डरला देखील त्याच्या चतुराईबद्दल दाद द्यावी लागेल.

दरम्यान, याआधी देखील क्रिकेटमध्ये अशाप्रकारे अनेक खेळाडू यापूर्वी धावबाद झाले आहेत. तसेच अनेक खेळाडू विचित्र पद्धतीने एकमेकांना धडकले असल्याचे देखील व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत.

Visit – policenama.com 

You might also like