Super ‘ओव्हर’ आणि Super ‘टायब्रेकर’वरून ‘विम्बल्डन-आयसीसी’मध्ये गंमतीशीर ‘संवाद’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलप्रमाणेच रविवारी क्रीडाप्रेमींना विम्बल्डनची रंगतदार फायनल देखील पाहायला मिळाली. त्यामुळे क्रीडारसिकांसाठी हा दुग्धशर्करा योग होता. क्रिकेटच्या सामन्यात सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाल्याने क्रीडा रसिकांना हा थरारक सामना पाहायला मिळाला तर दुसऱ्या बाजूला नोवाक जाेकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांच्यात विम्बल्डनची फायनल रंगली. त्यावेळी विम्बल्डन आणि आयसीसीच्या ट्विटर हॅण्डलवरील संवादाने देखील क्रीडा रसिकांचे मनोरंजन केले.

सुपर टायब्रेकरमध्ये नोवाक जाेकोविच विजेता
नोवाक जाेकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांच्यात झालेला हा सामना सुमारे साडेपाच तास रंगला. शेवटी या लढतीत नोवाक जाेकोविच याने शानदार विजय मिळवला. सुपर टायब्रेकरमध्ये त्याने फेडररचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

रोमहर्षक सामन्यात इंग्लंडची सरशी

दुसऱ्या बाजूला फायनलमध्ये दोनही संघानी उत्तम खेळ केला. मात्र सामना टाय झाला. त्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरदेखील टाय झाली. त्यानंतर विम्बल्डनच्या ट्विटर हॅण्डलवरुन आयसीसीला म्हटले कि, “हॅलो आयसीसी, तुम्ही तुमच्या शेवटाला कसे हाताळत आहात? त्यावर आयसीसीने देखील ट्विट करत उत्तर दिले कि, इथे सध्या थोडी धावपळ सुरु आहे, तुमच्याकडे लवकरच येऊ.

यामुळे क्रीडा रसिकांनी या दोन्ही सामन्यांचा आनंद घेतलाच मात्र त्याबरोबरच ट्विटरवरील या मजेदार संभाषणाचा देखील आस्वाद घेतला.

 

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या