Photos : ‘कोरोना’ मास्कचे ते फोटो ज्यांनी देशातच नव्हे तर जगात घातलाय धुमाकूळ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनाच्या काळात सर्वच लोक मास्क वापरताना दिसत आहेत. परंतु काही लोकांचे मास्क असे आहेत ज्यांनी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी वेगळं प्रिंटींग असणारं मास्क घातलं. काहींनी एकच पडका दात, मोठं तोंड किंवा मंकी फेस प्रिंट असलेले मास्क लावले. असे विचित्र मास्क असणारे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील रहिवासी शंकर कुराडे चर्चेत आले होते. त्यांनी सोन्याचा मास्क लावला होता ज्याची किंमत 2.89 लाख इतकी होती.

सोन्या चांदीसह अनेक मास्क असेही होते जे एलईडी लाईटनं सजलेले होते. अशाही काही मास्कनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

बहुत करून असे लोक दिसले ज्यांनी कॉमेडी प्रिंट असणारे मास्क चेहऱ्यावर लावले होते. अनेकांनी आपल्या फनी मास्कचे फोटो सोशलवरून शेअर केले जे व्हायरल होताना दिसले.

काहींनी तर चेहऱ्यांचा अर्धा भाग असणारं प्रिटींग असणारं मास्क लावलं होत. त्यांचं मास्क आहे की, चेहरा हेही ओळखू येत नव्हतं. जणू काही त्यांनी मास्क लावलंच नाही असं वाटत होतं.