पुण्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मार्केटयार्ड परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनला आज दुपारी भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ही कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

मार्केटयार्ड परिसरातील आईमाता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला आग लागील आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास आग लागली आहे. नागरिकांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. आग मोठ्या प्रमाणात लागली असून धूराचे लोट निघत आहे.

बघ्यांनी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून नागरिकांना बाजूला करुन अग्निशमन दलाच्या गाड्यांना वाट करुन देत आहेत. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us