धक्कादायक ! 2 दिवस पाण्यात बुडालं तरच मोफत ‘अन्नधान्य’, राज्य सरकारचा GR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवस पाण्यात बुडालं तरच अन्नधान्य मोफत देणार असल्याचे राज्य सरकारच्या ७ ऑगस्टच्या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. अडचणीत असताना मदतीसाठीही सरकारच्या अटी-शर्तींमुळे राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करत असल्याची टीका करण्यात येत आहे. दोन दिवस पाण्यात बुडालं तरच १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने काढेलेल्या जीआरमध्ये एखादा परिसर दोन दिवस पाण्याखाली असेल तरच तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येईल. मदत करण्याऐवजी राज्यसरकार पूरग्रस्थांची थट्टा करत असल्याची टीकेची झोड उठली आहे.

राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. शासन निर्णयानुसार पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू मोफत देण्यात येणार असल्याचे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र या मदतीसाठी राज्य सरकारने अजब निकष लावला आहे. जर एखादा परिसर दोन दिवस पाण्याखाली असेल तरच ही मदत देण्यात येणार आहे. शासनाने काढलेल्या या अनोख्या जीआरमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एक दिवस घर पाण्यात गेल्यावर नुकसान होत नाही का ? असा सवाल आता राज्य सरकारला विचारला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –