Fursungi TP Scheme | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांना राज्य शासनाचे दिवाळी ‘गिफ्ट’ ! प्रारूप टी.पी.स्किमला मान्यता

पुढील तीन ते चार वर्षात परियोजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Fursungi TP Scheme | राज्य शासनाने (Maharashtra Govt) उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) येथील नागरिकांना ‘दिवाळीचे’ गिफ्ट दिले आहे. येथील दोन नियोजीत टी.पी. स्किमच्या प्रारुप परियोजनेला राज्य शासनाने मान्यता दिली असून यामुळे उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील तब्बल ३७१ हेक्टरचा सुनियोजीत विकास होणार आहे. कायद्यातील बदलानंतर तब्बल ३५ ते ४० वर्षांनी पुणे महापालिकेच्या हद्दीत पुन्हा एकदा टी.पी. स्किम होत असून याठिकाणी भविष्यातील शहर नियोजनाच्या दृष्टीने आदर्शवत अशी अंमलबजावणी करण्यात येईल, असा दावा शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) यांनी केला. (Fursungi TP Scheme)

 

पुणे महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) उरूळी देवाची येथे एक आणि फुरसुंगी येथे दोन टी.पी.स्किम जाहीर केली होती. मागील तीन ते चार वर्षांमध्ये अगदी स्थानीक पातळीवर सर्वेक्षण करण्यासोबतच नागरिकांसोबत संवादाद्वारे जनजागृती करून आराखडा तयार करण्यात आला. यावर हरकती सूचना मागवून सुनावणी घेण्यात आली. यानंतर अंतिम अहवाल राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. येथील तीन पैकी उरूळी देवाची येथील टी.पी.स्किम ६ (११० हेक्टर) आणि फुरुसंगी टी.पी.स्किम ९ (२६१ हेक्टर) ला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली, अशी माहिती वाघमारे यांनी दिली. टी.पी.स्किम १० मध्ये बदल असल्याने त्यावर हरकती व सूचना घेउन सुनावणी घेण्यात आली असून पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. (Fursungi TP Scheme)

राज्य शासनाने दोन टी.पी. स्किमला मंजुरी देतानाच आर्बिट्रेटरचीही नियुक्ती केली आहे. पुढील काळात प्रत्यक्ष जागेवर आखणी होईल. यानंतर जागा मालकांच्या काही तक्रारी असतील तर आर्बिट्रेटरच्या माध्यमातून ऐकून अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. पुढील ९ महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल. याठिकाणी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, उद्याने व अन्य नागरी सुविधांसाठी सुमारे ७५० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाकडेही पाठ पुरावा करण्यात येणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

 

टी.पी. स्किममुळे फुरसुंगी व उरूळी देवाची येथे नियोजीत विकासाला चालना मिळणार आहे. स्थानीक नागरिकांना प्रशस्त रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा, उद्याने, मैदाने अशा नागरी सुविधा उभारण्यासाठी मोबदला देउन भूसंपादन करण्याची गरज भासणार नाही. कोरोनाच्या साथीमध्ये दोन वर्षे गेली असतानाही महापालिकेने या टी.पी.स्किमसाठी प्रयत्नपूर्वक काम केले. स्थानीक नागरिकांनीही भविष्याचा वेध घेउन प्रशासनाला साथ दिल्याने विक्रमी वेळेत मान्यतेचे टप्पे पूर्ण करणे शक्य झाले. स्थानीक नागरिक, नगररचना विभाग आणि राज्य शासनानेही फारसा विलंब न लावता मान्यता दिल्याने आभारी आहोत. येत्या काळात या टी.पी.स्किमची गतीने आणि आदर्शवत राहील यादृष्टीने अंमलबजावणी करण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील.

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक.

स्वातंत्र्यापुर्वीपासून इंग्रज राजवटीमध्ये अर्थात १९१५ पासून नियोजित शहरी विकासासाठी टी.पी.स्किम राबविण्यात येत आहेत. पुण्यामध्ये शिवाजीनगर-भांबुर्डा, सर्बबन नं. १, सोमवार – मंगळवार पेठ, येरवडा, हडपसर औद्योगिक वसाहत १ व २ , संगमवाडी व पर्वती अशा ८ टी.पी.स्किम राबविण्यात आल्या आहेत. तत्कालीन कायद्यातील तरतुदींमुळे अंमलबजावणीसाठी विलंब लागला होता. मात्र, १९६६ मध्ये कायद्यात बदल केल्यानंतर ४ ते ५ वर्षांत आराखड्यानुसार अंमलबजावणी करणे सुकर झाले आहे. उरूळी देवाची व फुरसुंंगी योजनेमध्ये मूळ भूखंड मालकाला ६० टक्के क्षेत्र परत करण्यात येईल. प्रत्येक भूखंडाला प्रशस्त व स्वतंत्र रस्ते असतील. उर्वरीत ४० टक्के जागेवर रस्ते, उद्याने, क्रिडागंणे, शाळा, दवाखाने अशा सुविधा निर्माण करण्यात येतील. येथील डोंगर माथा व उतारावरील १८ एकर जागेवर अर्बन फॉरेस्ट विकसित करण्यात येईल. सर्व रस्ते १२ मी. व त्याहून अधिक रुंदीचे असल्याने बांधकाम करतानाही फायदा होणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh PMC) यांनी दिली.

 

टी. पी. स्किमचे फायदे

– रस्ते, ड्रेनेज, पावसाळी गटारे यासारख्या मूलभूत सुविधांसाठी भूसंपादनाची गरज पडत नसल्याने नियोजीत व शास्त्रोक्त विकास होण्यास मदत.

– आरक्षित, शेती ना विकास योजनेतील भूखंड कोणताही प्रिमियम न आकारता निवासी होत असल्याने जमिन मालकांना लाभ होतो.

– नियोजित विकासामुळे सेवा, सुविधा पुरवणे सोपे होते. टी.पी. स्किममधील मिळकतींचे खुल्या बाजारातील मूल्य वाढते.

 

Web Title :- Fursungi TP Scheme | State Government’s Diwali ‘Gift’ to the people of
Uruli Devachi and Fursungi! Approval of Draft TP Scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा