अखेर का विकावा लागला बिग बाजार ? आता स्वत: किशोर बियानी यांनी सांगितले कारण

नवी दिल्ली : रिटेल किंग म्हणून ओळखले जाणारे किशोर बियानी यांनी ऑगस्टमध्ये फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि वेयरहाऊस बिझनेस 24,713 कोटी रूपयांत मुकेश अंबानी यांना विकला. रिटेल सेगमेंटमध्ये बिग बाजारचे मोठे नाव आहे, ज्यावर आता मुकेश अंबानी यांचा हक्क आहे. आता स्वत: किशोर बियानी यांनी हा व्यवसाय का विकावा लागला हे सांगितले.

2019 च्या अगोदर किशोर बियानी यांचा व्यवसाय वेगाने पसरत होता. किशोर बियानी यांचा फ्यूचर ग्रुप या वर्षीच्या सुरूवातीला आर्थिक संकटात आला. आता किशोर बियानी यांचे म्हणणे आहे की, कोरोना संकटामुळे स्थानिक रिटेल स्टोअर बंद होते, ज्या कारणामुळे सुरूवातीच्या तीन-चार महिन्यात सुमारे 7,000 कोटी रूपयांचा महसुल बुडाला, आणि नंतर व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकावा लागला.

त्यांनी सांगितले की, स्टोअर बंद राहिल्याने सर्वात मोठी समस्या भाडे नसून, कर्जाचे व्याज होते. यावर्षीच्या सुरूवातीला किशोर बियानी जेव्हा फ्यूचर रिटेलच्या कर्जाचे पैसे भरण्यास असमर्थ ठरले, तेव्हा बँकांनी कंपनीचे गहाण ठेवलेले शेयर जप्त केले.

फिगनीटेल रिटेल कन्व्हेन्शनमध्ये किशोर बियानी यांनी म्हटले की, कोरोना संकटाच्या सुरूवातीच्या 3-4 महिन्यांत आम्ही सुमारे 7,000 कोटींचा महूसल गमावला. यासाठी लोनवर येणार्‍या व्याजाला त्यांनी सर्वात जास्त जबाबदार ठरवले.

त्यांनी म्हटले की, मागील 6-7 वर्षात खुप ठिकाणी व्यवसाय सुरू केला, परंतु कोरोना संकटादरम्यान मला वाटले की, आता या व्यवसायातून बाहेर पडण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. किरकोळ विक्रेत्यांसाठी आतापर्यंतची ही सर्वात खराब स्थिती आहे.

साड्यांच्या व्यवसायापासून बिग बाजारपर्यंतचा प्रवास करणारे मारवाडी कुटुंबात जन्मलेले किशोर बियानी यांनी 1987 मध्ये पँटालूनची सुरूवात केली होती. पैशांची कमतरता असल्याने त्यांनी हा व्यवसाय 2012 मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपला विकला. पँटालून आणि बिग बाजारची सुरूवात बियानी यांनी कोलकातामध्ये केली होती.

किशोर बियानी यांनी बिझनेसची सुरूवात 1987 मध्ये केली होती, त्यांची पहिली कंपनी मेंज वियर होती. नंतर तिचे नाव पँटालून करण्यात आले. पुन्हा 1991 मध्ये तिचे नाव पँटालून फॅशन लिमिटेड केले. 2001 मध्ये किशोर बियानी यांनी संपूर्ण देशात बिग बाजारचे स्टोअर उघडले होते.