FYJC CET 2021 | इयत्ता 11 वी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – FYJC CET 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) नुकताच जाहीर झाला आहे. यानंतर सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे (FYJC CET 2021 ) वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 1 सीईटीची प्रवेश परीक्षा होणार असून परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना मंगळवार (दि. 20 जुलै) पासून सकाळी 11.30 वाजेपासून 26 जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Apply online) भरता येणार आहे.

FYJC CET 2021 | important news the 11th cet will be held on august 21

दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता 11 वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयात त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हॉल तिकीट (Hall ticket) देखील ऑनलाइन मिळणार आहे.

100 गुणांची परीक्षा

11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटीची परीक्षा 100 गुणांची असणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. 100 गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकेद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना 2 तासांचा कालावधी दिला जाणार आहे.

परीक्षा देणाऱ्यांनाच 11 वीत प्रवेश

सीईटीच्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना 11 वी मध्ये प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे

– राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

– अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येईल.

– राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाईल.

– सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांसाठी गणित (Mathematics), विज्ञान
(Science), समाजशास्त्र (Sociology), इंग्रजी (English) या 4 विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे
प्रश्न विचारले जातील.

– परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाईल.

हे देखील वाचा

MP Navneet Kaur Rana | ‘तीन पिढ्यांपासून BMC चालवणारे ठाकरे कुटुंब फेल’; असं का म्हणाल्या खा. नवनीत राणा, जाणून घ्या

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 13,051 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  FYJC CET 2021 | important news the 11th cet will be held on august 21

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update