Coronavirus : सर्वप्रथम ‘माणुसकी’ महत्वाची, ‘G 20’ परिषदेत मोदींनी सांगितलं, भारताची ‘भूमिका’ महत्त्वाची

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व जगच हादरून गेले आहे. सर्व जगासमोर संकट निर्माण करणार्‍या कोरोनावर चर्चा करण्यासाठी जी 20 प्रगत देशांच्या प्रमुखांची परिषद झाली. सर्व नेते व्हिडीओ कॉन्फरन्सने जोडले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, क्षी जिनपिंग, यांच्यासह सदस्य देशांचे अनेक नेते यात सहभागी झाले होते. कोरोना व्हायरस म्हणजे मानवतेसमोरचे आव्हान असून सगळ्यांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे असे मत नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केले माणुसकी सगळ्यात पाहिले असली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसचा बिमोड करण्यासाठी सर्व जगात संशोधन सुरू आहे त्याचे आदानप्रदान झाले पाहिजे.

जागतिक अर्थव्यवस्थेला जी मरगळ आली आहे आहे ती दूर करण्यासाठी जी 20 या संघटनेचे सर्व देश 5 लाख कोटी डॉलर्सचा निधी उभा करतील असा निर्णयही या परिषदेत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच ही परिषद घेण्यात आली होती. सोदीअरेबिया हा सध्या या संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मंगळवारी पंतप्रधनांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सलमान यांनी अध्यक्ष या नात्याने ही बैठक बोलावली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व देश एक प्रकारे घरातच बदिस्त झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखायला असेल तर लॉकडाउन हा सर्वात मोठा उपाय आहे असे पंतप्रधानांनी म्हटले होते. सध्यातरी त्याच्याशिवाय मार्ग नाही असेही त्यांनी सांगितले. कोरोना हा एका माणसातून दुसर्‍यामध्ये संक्रमीत होते. त्यामुळे त्याची साखळी तोडणे आवश्यक असते.