G-20 summit : भारताची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलर होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

टोकियो : वृत्तसंस्था – जपानच्या ओसाकामध्ये जी-२० परिषदेत भाग घेण्यासाठी जगभरातले दिग्गज नेते एकत्र आले आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी जपानच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत.जगभरतील ८५ % अर्थव्यवस्थेचा भाग असणाऱ्या बलशाली २० देशांची संघटना असणाऱ्या G-20 संघटनेच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे ध्येय स्पष्ट केले. भारत २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारत हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात पसंतीचा देश आहे. ज्या लोकंना पैसा, समृद्धी, शांती पाहिजे अशा लोकांना भारतात येण्याचे निमंत्रण मोदींनी दिले आहे. भारत सरकार आर्थिक सुधारणा आणि मोठ्या बदलासाठी कडक पाऊले उचलत आहे.

मोदी उवाच

भारताचा GDP सध्या ३ लाख करोड डॉलर इतका आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही भारतामध्ये गुंतवणूक, उत्पादन आणि बिजनेस करणे सोप्पे बनवले आहे. पुढील काही वर्षात परवानराज, परमिट राज यांना मुळापासून काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही लाल फितशाहीमध्ये अडकलेला व्यवहार वेगात बदलत आहोत. जगभरात भारत हा गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगले स्थान आहे. जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला ओळखले जाते.

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना लोकसभेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तुम्ही चांगले काम करत आहात असे देखील ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात खास करून द्विपक्षीय संबंध, संरक्षण संबंध, इराण आणि व्यापारी या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी भारतासोबत अमेरिकेच्या असलेल्या चांगल्या संबंधांचं देखील उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिकेच्या संबंधं आज जितके चांगले आहे. असे पूर्वीही कधीही नव्हते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्याच्या मुद्द्यांसहित काही क्षेत्रात भारतासोबत मिळून काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

G-20 काय आहे?

जगातली सर्वाधिक औद्योगिकरण झालेली 19 राष्ट्रं आणि युरोपीय महासंघ यांचा मिळून G20 हा समूह आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन आणि अमेरिका, हे सर्व जगातील मुख्य देश या समूहाचे सदस्य आहेत. या संघटनेची वर्षातुन एकदा बैठक होते. या बैठकीत या संघटनेतील देशांचे प्रमुख एकमेकांना भेटतात. या बैठकीत मुख्यत्वे आर्थिक विषयांवर चर्चा केली जाते.

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’

Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची भारिपकडून मागणी

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …