अर्जुन आणि गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या बाळाचा ‘पहिला’ फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन रामपाल नुकताच तिसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने गुरुवारी (दि. १८ जुलै) बाळाला जन्म दिला आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाने आतापर्यंत आपल्या बाळाचे नाव ठेवले नाहीये. चाहत्यांनाही या बेबी बॉयच्या पहिल्या फोटोची खूपच प्रतिक्षा आहे. नुकताच अर्जुनच्या मुलाचा पहिला फोटो समोर आला आहे. गॅब्रिएलाने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. आपल्या इंस्टा स्टोरीवर तिने काही फोटो पोस्ट केले  आहेत. 

image.png

एका फोटोत अर्जुनने आपल्या मुलाला कडेवर घेतल्याचे दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोत बाळाचा फोटो दिसत नाहीये, फक्त त्याचा हात दिसत आहे. अर्जुन आपल्या बाळाला कडेवर घेत त्याला न्याहाळताना दिसत आहे.

image.png

याशिवाय आणखी एका फोटोत अर्जुन एका बॉक्समधील टेडी बेयर दाखवत पोज देताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोबद्दल बोलायचे झाले तर यात गॅब्रिएलाने सांगितले आहे की, तिला थोडा चेंज हवा होता. तिने तिचा एक नवीन फोटो शेअर केला आहे.

image.png

गॅब्रिएलाच्या केसांबद्दल बोलायचे झाले तर तिचे  केस काळे होते, तिने ब्लॉन्ड हेअरकलरमधील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. जेव्हा गॅब्रिएला रुग्णालयात दाखल झाली होती तेव्हापासूनच तिचे पूर्ण कुटुंब तिच्या सोबत होते. रुग्णालयाबाहेर अर्जुनसोबत त्याच्या मुलींचाही फोटो समोर आला होता.

image.png

गॅब्रिएलाला मुलगा झाल्यानंतर अर्जुनच्या मुली माहिका आणि मायरा बाळास भेटण्यासाठी आल्या. अर्जुनच्या कुटुंबाव्यतिरीक्त गॅब्रिएलाचे पॅरेंट्सही साऊथ अफ्रिकावरून भारतात दाखल झाले आहेत.

image.png
Loading...
You might also like