Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, Video आला समोर

पोलीसनामा ऑनलाईन : Gadar 2 | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा 2001मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक ‘हँड पंम्प’ सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तर सनी देओलनं गदर (Gadar 2) चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

20 वर्षांपूर्वीच्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे.‘गदर 2’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो हातात मोठा हातोडा घेऊन उभा दिसला.आता या चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सनी देओल जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे.

 

यात सनी म्हणजेच तारा सिंग आणि अभिनेत्री सिमरत कौर दोन सिमेंटच्या खांबांना बांधलेले दिसत आहेत.
त्यांच्यासह बाजूला पोलीस बंदूक घेऊन उभे आहेत.
अशातच सनीचा राग अनावर होतो आणि त्याला ज्या खांबाला बांधलेला आहे तो खांबच तो उखडून टाकतो.
त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असलेल्या नायिकेलाही वाचवतो. यावेळी सनीने पठाणी सूट आणि डोक्यावर पगडी असा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या व्हायरल झालेला व्हिडीओमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसत आहे. अनिल शर्मा हे गदर-2 (Gadar 2) चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मासुद्धा भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष यामध्ये सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title :- Gadar 2 | behind the scene video of sunny deol starrer gadar 2 film got viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड