Gadar 2 | गदर 2 चित्रपटासाठी सनी-अमिषाने घेतले एवढे मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Gadar 2 | बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. ते त्यांच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर गदर चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर- 2’ सिनेमासाठी प्रेक्षक आणि निर्मात्यांची पहिली निवड सनी आणि अमिषा होते. (Gadar 2)

 

या दोघांना या चित्रपटासाठी कास्ट करण्यासाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ‘गदर- 2’ साठी सनी आणि अमिषा यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतले आहे. गदरमधील सनी आणि अमिषाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या पार्टमध्ये निर्मात्यांनी सनी आणि अमिषा यांची निवड केली. (Gadar 2)

 

या चित्रपटासाठी सनी देओलने 5 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर अमिषाने 2 कोटी रुपये मानधन घेतले आहे. सध्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता गदर प्रमाणे गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात किती यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Gadar 2 | Sunny-Amisha paid for Gadar 2 movie; You will be shocked to read the figure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान