GADAR2 | तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा तारा सिंह बनणार सनी देओल, सकीनाच्या लुकमध्ये दिसेल अमिषा पटेल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – GADAR2 | बॉलीवूडमध्ये अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) पुनरागमन करणार आहे. अमीषानं अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सोबत त्यांचा आगामी चित्रपट GADAR2 च्या शूटिंगची सुरूवात केली आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर ती आता पुन्हा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

अमीषानं तिच्या सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाऊंटवर चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं , “गदर 2- मुहूर्त शॉट.” असं लिहिलं आहे. तर फोटोमद्. तिनं पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.

हातात भरपूर बांगड्यासुद्दा आहे. तसेच सनी देओलनं फोटोमध्ये लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. फोटोमध्ये त्यांच्या सोबत (Upcoming Movie) चित्रपटाचं दिग्दर्शक अनिल शर्मा देखील आहे. GADAR2 चित्रपटामध्ये त्या दोघांव्यतरिक्त उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे. उत्कर्ष त्या दोघांच्या मुलाची भूमिका निभावणार आहे.

दरम्यान, चित्रपटाचं शूटिंग हिमाचल प्रदेशात होणार आहे. जवळपास सनी आणि अमीषा 20 वर्षानंतर पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अमीषा सकीना, तर सना ताराची भूमिका निभावणार आहे.

मात्र यावेळी चित्रपटातील तारा सिंह पत्नीसाठी पाकिस्तानात जाणार नसून, आपल्या मुलासाठी जाणार आहे. ‘गदर 2’ 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातयं. रसिक प्रेक्षक (Gadar 2)‘गदर 2’ पाहण्यासाठी अत्यंत आतुर पाहायला मिळतात.

Web Title : GADAR2 | gadar 2 after 20 years once again sunny deol ameesha patel became tara singh sakina

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

World Aids Day 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 7 लक्षणे तर असू शकतो एड्सचा संकेत, असा करा बचाव

Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | अखेर लग्न बंधनात अडकले निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, लग्नाचे फोटो आले समोर

Shehnaaz Kaur Gill | सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच शहनाज पोहचली ‘अनाथ आश्रम’मध्ये, चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले…

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

PM Kisan योजनेसह ‘या’ 4 योजनासुद्धा खुपच कामाच्या, सबसिडीवर खरेदी करू शकता खत, बियाणे आणि ट्रॅक्टर; जाणून घ्या