‘गदर’ चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अनिल शर्मा दिग्दर्शित अभिनेता सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अजून आहे. या चित्रपटाला अनेक वर्षे झाली. तरीही याची जादू कमी झालेली दिसून येत नाही. या चित्रपटातील गाण्यांपासून ते डायलॉग पर्यंत सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. अशा प्रेमकहाणीचा आता पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारत-पाकिस्तान या दोन देशांतील संबंध, फाळणी आणि त्याभोवती फिरणारी एक प्रेमकहाणी असं एकंदर कथानक या चित्रपटातील गाण्यांपासून त्यातील प्रत्येक संवादापर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘गदर’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटांच्या यादीतही गणला जाणाऱ्या चित्रपटापैकी एक आहे. एका सुत्राने माहिती दिल्यासूनार गेल्या पंधरा वर्षापासून गदरच्या सिक्कलवर काम सुरु असून तारा (सनी देओल), सकीना (अमिषा पटेल) आणि जीत (तारा-सकीना यांचा मुलगा) यांची कथा त्यातून साकारण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान संबंधांची जोड त्याला असेल, किंबहुना त्याशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दोन देशांमध्ये असणारे तणावपूर्ण संबध असणाऱ्या चित्रपटाची कथा नेमकी कोणत्या वळणावर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे कलाविश्वात आता अभिनेता सेनी देओल याने त्याचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सनी राजकारण आण अभिनय या दोन्ही क्षेत्रामध्ये समतोल राखण्यात यशस्वी ठरतो का ? याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

‘गदर’ याचित्रपटातील अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांनी मुख्य भूमिकेत काम केलेल्या या चित्रपटाला अनेक वर्षे झाली आहे. अशी प्रेमकहाणीचा पुढचा भाग अर्थात ‘गदर’ चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.