Gadchiroli | गडचिरोलीमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक ! मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, 4 पोलिस जखमी

0
196
Gadchiroli | 26 naxalites killed flint firing police dhanora taluk gadchiroli district
File Photo

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल (Gyarapati-kotgul jungle) जंगल परिसरात आज (शनिवार) पहाटे पासून पोलीस (Maharashtra Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxalite) मोठी चकमक (Flint) झाली. यामध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा (encounter) करण्यात पोलिसांना (Maharashtra Police) यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (Additional Superintendent of Police Sameer Sheikh) यांनी काँबॅट ऑपरेशन संदर्भात (combat operation) सविस्तर माहिती दिली. यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Gadchiroli) आहे.

 

 

पोलीस (Maharashtra Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच 4 पोलीस जवान जखमी (jawan Injured) झाल्याचे समजते. परंतु अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-60 पथक (C-60 unit) शोध अभियान (Search operation) राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक पथकावर गोळीबार (Firing) सुरु केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. यामध्ये 26 पेक्षा अधिक नक्षलवादी ठार (Gadchiroli) झाले.

 

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून समजते. चकमकीत चार पोलीस जवान जखमी झाल्याचे कळते. या चकमकीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही सूत्रांच्या माहितीनुसार 6 नक्षलवादी ठार झाल्याचे बोलले जात आहे. आज झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतु यामध्ये संघटनेच्या एका मोठ्या नेत्याचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी अद्याप पोलिसांकडून कारवाई सुरुच आहे.

 

Web Title :- Gadchiroli | 26 naxalites killed flint firing police dhanora taluk gadchiroli district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा