गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य कृषी यांत्रिकीकरण (State Agricultural Mechanization Scheme) योजने अंतर्गत कम्बाईन हार्वेस्टर खरेदी केल्याने अनुदानाची रक्कम (Grant Amount) बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करुन 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) गडचिरोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील लेखा विभागाचा वरिष्ठ लिपीक आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला गडचिरोली एसीबीने (Gadchiroli ACB Trap) रंगेहात पकडले. गडचिरोली एसीबीच्या पथकाने (Gadchiroli ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.7) गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोरील मुख्य रस्त्याच्या बाजूला सापळा रचून केली.
वरिष्ठ लिपीक (Senior Clerk) संदीप अशोकराव वैद्य Sandeep Ashokarav Vaidya (वय- 33) आणि तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer), अति. प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली प्रदीप पुंडलीक वाहाने Pradeep Pundalik Vahane (वय 49) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत आरमोली तालुक्यातील 42 वर्षीय व्यक्तीने गडचिरोली एसीबीकडे (Gadchiroli ACB Trap) तक्रार केली आहे.
तक्रारदार यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हार्वेस्टर (Combine Harvester) खरेदी केले आहे. अनुदानाचे 11 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून संदीप वैद्य यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती स्वत: व प्रदीप वाहाने यांचेसाठी 40 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी मंगळवारी (दि.6) गडचिरोली एसीबीकडे याबाबत तक्रार केली.
गडचिरोली एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता संदीप वैद्य व प्रदीप वाहाने यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 40 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. बुधवारी (दि.7) गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील चंद्रपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे बाजूस असलेल्या चंद्रप्रकाश गेडाम यांच्या चहाटपरी येथे सापळा रचण्यात आला. संदीप वैद्य याला तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती ठरलेले 40 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. तर स्वीकारलेल्या लाचेच्या रक्कमे पैकी 20 हजार रुपये स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहाने यांना उपविभागीय कृषी कार्यालय गडचिरोली येथे रंगेहात पकडण्यात आले.
पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड करीत आहेत.
ही कारवाई नागपूर एसीबी विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी गडचिरोलीचे पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड (DySP Surendra Gard), पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड (Police Inspector Shivaji Rathod),
पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले (Police Inspector Sridhar Bhosale),
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद ढोरे (PSI Pramod Dhore), पोलीस अंमलदार नथ्थु धोटे,
राजेश पदमगीरवार, स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजारकर,
श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप उडाण, जोत्सना वसाकेयांच्या पथकाने केली.
Web Title :- Gadchiroli ACB Trap | Two persons from District Agriculture Officer’s office
caught in anti-corruption net while taking Rs 40 thousand bribe
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Malaika Arora | मलायकाने ‘या’साठी केले होते अरबाज खानशी लग्न ; “मला घरातून बाहेर…”
- Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी
- Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या तीन जणांना अटक