Gadchiroli Crime | बंदोबस्तासाठी पुण्याहून गडचिरोलीला गेलेल्या SRPF च्या जवानाने सहकाऱ्यावर रायफलने झाडली गोळी, नंतर केली आत्महत्या

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Gadchiroli Crime | माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या (Maharashtra State Reserve Police Force (Maha SRPF) जवानाने (Soldier) अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत (Gadchiroli Crime) घडली आहे. जवानावर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत: वर गोळी झाडून (Firing) आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे राज्य राखीव दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. श्रीकांत बेरड (Shrikant Baird) आणि बंडु नवतरला (Bandu Navtarla) अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. पुण्यातून (Pune) हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात करण्यात (Gadchiroli Crime) आले होते.

राज्य राखीव दलाच्या जवानामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत याने बंडूवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान होते. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

 

Web Title :- Gadchiroli Crime | Maharashtra State Reserve Police Force (Maha SRPF)
pune soldier opened fire on his colleague then committed suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा