Gadchiroli Crime News | राजकीय अडथळा दूर करण्यासाठी ‘सुपारी’ देऊन केली ‘हत्या’ ! नगरसेवक प्रशांत खोब्रागडेला अटक, 5 लाखांची दिली होती सुपारी

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Gadchiroli Crime News | आगामी निवडणुकी (Election) तील संभाव्य अडथळा दूर करण्यासाठी सुपारी देऊन दुर्योधन रायपूरे यांची हत्या केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणून नगरपरिषदेचे वित्त व नियोजन सभापती नगरसेवक  प्रशांत खोब्रागडे (Finance and Planning Chairman Corporator Prashant Khobragade) याला अटक (Arrest) केली आहे. त्यानेच पाच लाखांची सुपारी देऊन हत्या (Murder) घडवून आणली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय आणखी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रशांत खोब्रागडे हा गडचिरोलीतील फुले वॉर्डचा नगरसेवक (Phule Ward Corporator ) आहे. दुर्योधन रायपुरे (Duryodhana Raipure) यांची २४ जून रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी अमन कालसर्पे (वय १८), प्रसन्ना रेड्डी (वय २४), अविनाश मत्ते (वय २६), धनंजय उके (वय ३१, सर्व रा. गोंदिया) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात  हे हत्याकांड राजकीय वैमनस्यातून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.

येणार्‍या नगर परिषदे (Municipal Council) च्या निवडणुकीतील राजकीय अडथळा बाजूला सारण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपूरे यांना संपविण्याचा कट रचण्यात आला. खोब्रागडे याने गोंदिया जिल्ह्यातील चौघांना ५ लाख रुपयांची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी खोब्रागडे हा तिथे हजर नव्हता. मात्र काम फत्ते झाल्यानंतर सुपारी घेणार्‍यांना त्याने ५० हजार रुपये दिले. प्रशांत खोब्रागडे याला अटक करण्यात आली असून आज शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांनी सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Gadchiroli Crime News | Assassination’ by giving ‘betel nut’ to remove political obstacle! Corporator Prashant Khobragade was arrested and given betel nut worth Rs 5 lakh


हे देखील वाचा

 

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह 2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान