सरकारी कार्यालयातील ‘कॉम्प्युटर’, ‘लॅपटॉप’ चोरी करणारी टोळी जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील विविध गावातील शासकीय व खाजगी कार्यालय फोडून लॅपटॉप, संगणक, प्रिंटर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.

आरमोरी पोलीस स्टेशन मध्ये संगणक, प्रिंटर, चोरी झालेल्याची तक्रार तक्रारकर्त्यानी केली होती. पोलीसांनी तपास करणे चालू केले. त्याचबरोबर गाडचिरोली मधेच नव्हे तर आसपासच्या, चंद्रपूर आणि गोंदिया मध्ये ही १० ते १५ संगणक, प्रिंटर चोरी गेल्याचे गुन्हे नोंदविले आहेत.

पोलिसांनी सापळा रचून यातील प्रमुख आरोपी विकास शर्मा याला भंडारा येथून अटक करुन इतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. विविध ठिकाणांवरून लॅपटॉप, प्रिंटर, प्रोजेक्टर, संगणक संच, डीजे संच, संगणकाचे सामान, मॉनिटर, मायक्रोस्कोप अशा अनेक वस्तू चोरल्याची आणि 12 गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. आरोपींकडून लॅपटॉप, प्रिंटर, प्रोजेक्टर, संगणक संच, डीजे संच, मॉनिटर, मायक्रोस्कोप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल आरमोरी पोलीसानी जप्त केला आहे.