Gadchiroli Encounter | 50 लाखाचं ‘इनाम’ असलेला नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेसह महेश गोटा, लोकेश मडकामचा चकमकीत ‘खात्मा’ ! चार AK 47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Gadchiroli Encounter | मौजा मर्दीनटोला जंगल परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात महाराष्ट्रा पोलिसांच्या सी -६० जवानांना यश आले आहेत. त्यात ५० लाख रुपयांचे बक्षीस असलेला व एमएमसीचा सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडे (Milind Baburao Teltumbde alias Deepak Teltumbde) याचा समावेश असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. या चकमकीत ठार झालेल्या २६ जणांपैकी २० जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तेलतुंबडे, १६ लाख रुपये बक्षीस असलेला महेश ऊर्फ शिवाजी रावजी गोटा, २० लाख रुपये बक्षीस असलेला लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम/मडकाम यांचा समावेश आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले असून नक्षल चळवळीला मोठा धक्का (Gadchiroli Encounter) बसला आहे.

या चकमकीत नक्षलवाद्यांचे अनेक महत्वाचे नेते ठार झाले असून राज्याच्या इतिहासात नक्षल्यांसोबत झालेली आजवरची ही सर्वात मोठी चकमक ठरली आहे. ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षलवाद्यांचे शिबीर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सी ६० पथकाच्या जवानांनी या संपूर्ण परिसराला घेरुन नियोजनबद्धरित्या अभियान सुरु केले. चारही बाजूने कोंडी केल्याने नक्षलवादी हतबल झाले. त्यांनी केलेल्या गोळीबारात (Gadchiroli Encounter) तीन पोलीस जखमी झाले. त्याचवेळी पोलिसांच्या गोळीबारात २६ नक्षलवादी ठार झाले. तेथे मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात ४ एके ४७ रायफल, ५ एसएस आर रायफल, पिस्टल, १२ बोरच्या बंदुका, गोळ्या असा मोठा शस्त्र साठा हाती लागला आहे.

मिलिंद तेलतुंबडे याचे पुण्यात होते वास्तव्य

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या (elgar parishad) आयोजनात मिलिंद तेलतुंबडे हा पडद्यामागील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याप्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. मिलिंद तेलतुंबडे हा शहरात नक्षलवाद पसरविण्याच्या प्रयत्नात होता. शहरात नक्षलवाद्यांविषयी सहानभुती बाळगणार्‍यांना एकत्र करणे, शहरी तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे ओढणे अशा कामासाठी तो शहरांमध्ये स्लिपर सेलचे जाळे तयार करण्याचे काम करीत असे. त्यासाठी त्याने नाव बदलून काही काळ पुण्यात वास्तव्य केले होते. पुणे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष्य केंद्रित केल्यानंतर तो पसार झाल्याचे सांगितले जाते.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI (Maoist) (माओवादी) या संघटनेचा सक्रीय सदस्य असलेल्या अरुण भेलके याला ATS ने पकडले आहे.
अरुण भेलके (Arun Bhelke) याच्याविरुद्ध काही महिन्यांपूर्वी खटल्याची सुनावणी सुरु झाली.
त्यात शरण आलेल्या कृष्णा दोरपटे याची पुण्यातील विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली होती.
त्यात अरुण भेलके याने गडचिरोलीच्या जंगलात मिलिंद तेलतुंबडे याची भेट घेतल्याचे सांगितले होते.

मिलिंद तेलतुंबडे हा प्रामुख्याने कॉम्रेड एम, सह्याद्री या नावाने ओळखला जात असे.
पत्रव्यवहार करताना तो नेहमी सह्याद्री या नावाचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे.
या शिवाय दीपक, अरुण, सुधीर, प्रवीण अशा विविध नावाने तो वावरत असे.

मिलिंद तेलतुंबडे (Milind Baburao Teltumbde alias Deepak Teltumbde was head of the newly formed MMC zone (Maharashtra-Madhya Pradesh-Chhattisgarh confluence) याच्याबरोबरच या चकमकीत (Gadchiroli Encounter) अड्मा पोड्याम, बंडु ऊर्फ दलसू राजू गोटा (४ लाख बक्षीस), प्रमोद ऊर्फ दलपत लालसाय कचलामी (४ लाख बक्षीस), कोसा ऊर्फ मुसाखी (४ लाख), चेतन पदा (२ लाख), विमला ऊर्फ ईमला ऊर्फ कमला ऊर्फ मोन्सा सुखराम बोगा (४ लाख), किशन ऊर्फ जैमन ( ८ लाख), महेश ऊर्फ शिवाजी रावजी गोआ ( १६ लाख), भगतसिंग ऊर्फ प्रदिप ऊर्फ तिलक मानकुर जाडे (६ लाख), सन्नू ऊर्फ साधु सोनू बोगा ( ४ लाख), लच्छु (४ लाख), नवलुराम ऊर्फ दिलीप हिरुराम तुलावी ( ४ लाख), लोकेश ऊर्फ मंगू पोड्याम/मडकाम ( २० लाख रुपये) हे ठार (Gadchiroli Encounter) झाले आहेत.”

Web Titel : Gadchiroli Encounter | Naxal leader Milind Teltumbde, Mahesh Gota, Lokesh Madkam clash with ‘reward’ of Rs 50 lakh! Large arsenal with four AK-47s seized

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा