गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात ‘मिलिंद तेलतुंबडें’चा हात ?

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसूरुंगात १५ जवान शहीद झाले. या हल्ल्याप्रकरणी नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव भीमी हिंसाचारानंतर या प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या १८ सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. याप्रकरणी शनिवारी (दि.४) पुराडा पोलीस ठाण्यात नक्षलवाद्यांविरुद्ध हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘त्या’ कारवाईचा बदला घेण्यासाठी केला हल्ला ?

नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात एक चालक आणि १५ जवान शहीद झाले. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे तुकडे -तुकडे झाले. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला बदला घेण्यासाठी केला असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी नक्षवादविरोधी केलेल्या कारवाईचा हा बदला असल्याचेही बोलले जात आहे. २०१८ मध्ये गडचिरोलीमध्ये नक्षलवादविरोधी कारवाईमध्ये १६ नक्षलवादी मारले गेले होते. २२ एप्रिल २०१८ रोजी एटापल्लीमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. बेरियाच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्ष यंत्रणामध्ये झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार झाले होते.

पथकाने केलेल्या तीव्र कारवाईत नक्षलवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सून या दोघांचा खात्मा करण्यात आला होता. त्यावेळी पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटके जप्त केली होती. राज्यात मागील चाळीस वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई होती. यानंतर या कारवाईचा बदला घेण्यासाठीच नक्षलवाद्यांनी १ मे रोजी हल्ला घडवला. याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.